सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (10:11 IST)

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्गातच मृत्यू दिल्लीतील घटना

आंध्र प्रदेशपाठोपाठ आता दिल्लीतील रोहिणीत एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात मुलाचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच समजल  नाही. आता मयत मुलाच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
 
मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांची अवस्था बिकट आहे. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याचे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकरण रोहिणी भागातील एका सरकारी शाळेचे आहे. जिथे वर्गात बसलेल्या दुसऱ्या वर्गातील मुलाचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गात बसलेल्या अवस्थेत मुलगा बेहोश झाल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यानंतर मुलाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणी पोस्टमॉर्टम केले जाईल, जेणेकरून मुलाच्या मृत्यूचे कारण काय आहे हे कळू शकेल. सद्यस्थितीत पोलीस काही गैरकृत्य होण्याची शक्यता नाकारत आहेत.
 
या पूर्वी आंध्रप्रदेशातील नेल्लोर शहरात जिल्हा परिषद शाळेत 7 सप्टेंबररोजी इयत्ता 7 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची वर्गातच मृत्यू झाल्याची घटना घडली. वर्गात मयत मुलीला प्रश्न विचारताना उत्तर देताना तिचा मृत्यू झाला. त्या विद्यार्थिनीवर शिक्षिकेने तिला शुद्धीत आणण्यासाठी पाणी घातले त्यांना वाटले की अशाने तिला शुद्ध येईल पण तिला रुग्णालयात नेई पर्यंत तिचा मृत्यू झाला होता.