गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (09:17 IST)

शांतीगिरी महाराज नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार

Shantigiri Maharaj
facebook
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांचे अनुवयी विष्णु महाराज यांनी केली आहे. दरम्यान नाशिक बरोबरच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणुकीची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत साठी मतदार संघात सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शातिगिरीजी महाराज याना देशभक्तीसाठी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.
 
यावेळी विष्णू महाराज म्हणाले की, राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे या हेतूनेच शांतिगिरी महाराजांना निवडणूक रिंगणामध्ये उतरविले जात असून नाशिक बरोबरच संभाजीनगर या दुसऱ्या लोकसभा मतदारसंघासाठी देखील आमची तयारी सुरू आहे, असे सांगून त्यांनी पुढे सांगितले की,  आम्ही कोणत्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणार नाही जे पक्ष आमच्याबरोबर येतील त्यांचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना बरोबर घेऊन पुढे चालू.

Edited By -  Ratnadeep ranshoor