1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2023 (18:39 IST)

माजी महापौर संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला

uddhav ajit panwar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरेयांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे गटात स्वागत केले.   

या वेळी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार तसेच ठाकरे गटाचे इतर नेते उपस्थित होते. वाघेरे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. तसेच पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. वाघेरे हे मावळ मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक मानले जात आहे.   
वाघेरे यांनी आज उद्धव ठाकरे यांचा कडून शिवबंधन बांधून घेतले. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात ठाकरे यांचे काम पाहून मी प्रभावित झालो. त्यांनी केलेल्या कामामुळे आपण कोरोनाविषाणूशी लढू शकलो. आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विचार केला. असे मितभाषी व्यक्तिमत्त्वाच्या खाली पडेलती जबाबदारी आम्ही घेण्यास तयार आहो. 

Edited By- Priya DIxit