सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 28 मे 2023 (16:19 IST)

Badmer : एकाच घरातल्या 21 जणांचे केले सामूहिक लग्न

लग्न म्हटलं की ते भव्य केले जाते आणि त्यासाठी वायफळ खर्च केला जातो. बाडमेर मध्ये देरासरच्या हाजी शौबत कुटुंबातील एकाच घरातील 21 तरुणांचे सामूहिक लग्न केले आहे. लग्नावर वायफळ खर्च न करता सामूहिक लग्न करण्याचा विचार या कुटुंबातील सदर हाजी इदरिश यांनी एक नवीन संकल्पना करत अनावश्यक खर्च टाळण्यासाठी कुटुंबातील 21 तरुण आणि तरुणींचे सामूहिक लग्न लावून दिले. या सोहळ्यातून वाचलेले पैसे समाजाच्या शिक्षणावर खर्च करावे असा विचार केला आणि तसा प्रस्ताव त्यांनी कुटुंबीयांसमोर मांडला.  
 
एकाच मंडपात 21 नवरदेव आणि वधूचा लग्न सोहळा झाला. या लग्न समारंभासाठी शेकडो लोकांनी हजेरी लावून नवंदाम्पत्याला आपले आशीर्वाद दिले. 

लग्न समारंभात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला वाचविण्यासाठी तसेच उरलेले पैसे सामाजिक शिक्षणात देण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या या नवीन संकल्पनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एकाच कुटुंबातील 21  जणांचे लग्न एकाच वेळी करून त्यांनी वेळेची आणि पैशाची बचत करण्याचा संदेश समाजाला दिला आहे. 
 
Edited by - Priya Dixit