मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2019 (10:20 IST)

धावत्या लोकलवर फेकले दगड तिघे अटकेत तर एकावर चार गुन्हे केले दाखल

मुंबईतील उपनगरीय धावत्या लोकलवर दगडफेकीत चारजण जखमी झाले असून रेल्वे पोलिसांनी या घटनेच्या काही तासांनी टिळक नगर येथून एकाला, तर सायन धारावी येथून दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण कचरा वेचणारा असून इतर दोघे सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणारे आहेत.
 
कुर्ला पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने एकाच वेळी कुर्ला आणि टिळक नगर येथे तीन लोकल ट्रेनवर दगड भिरकावल्याचे समोर आले आहे. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले, तर सायन येथे दारू पीत बसलेल्या दोघांपैकी एकाने बिअरची रिकामी बॉटल धावत्या ट्रेनवर फेकल्यामुळे बॉटलच्या काचा लागून दोघे तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. राकेश धरपासिंग रोड (३५) असे कुर्ला पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मूळचा हरियाणा येथे राहणारा राकेश हा कुर्ला येथे फुटपाथवर राहून रेल्वेत कचरा वेचण्याचे काम करतो. चारही घटनामध्ये राकेश रोड या आरोपीचा समावेश आढळून आला आहे. राकेशला गुरुवारी कुर्ला परिसरातून अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.दरम्यान गुरुवारी रात्री सायन रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपडपट्टी येथे दारू पिण्यास बसलेल्या दोघापैकी एकाने ठाण्याकडे जाणाऱ्या धावत्या लोकल ट्रेनवर बिअरची रिकामी बॉटल फेकली असता बॉटलच्या काचा लागून तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. या प्रकरणी दादर पोलिसानी दोघांना धारावी झोपडपट्टी येथून अटक केली.