मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जुलै 2019 (09:34 IST)

अद्याप 113 परीक्षांचे निकाल नाहीत

मुंबई विद्यापीठाकडून अद्याप 113 परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या एकूण 731 परीक्षांपैकी 175 परीक्षा महाविद्यालय पातळीवर घेण्यात येतात. तर 438 परीक्षा विद्यापीठाद्वारे घेण्यात येतात. विद्यापीठाने आतापर्यंत 225 परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मात्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यापीठातून इतर विद्यापीठात प्रवेशाची इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या या कारभारामुळे कोंडी झाली आहे. 
 
विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाने परीक्षा घेतल्यानंतर 45 दिवसांमध्ये निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतू विद्यापीठाने परीक्षा होउन 45 दिवसांचा अवधी लोटला तरी अद्याप 113 परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. जुलै महिना संपत आला तरी विद्यापीठाकडून निकाल जाहीर होत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.