मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग नावाच्या इमारतीचा बराचसा भाग कोसळला असून तिथे 40-50 अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही चार मजली इमारत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जवानांना एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश मिळालं आहे. ...