सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत 4 मजली इमारत कोसळली, 50 लोक अडकले

मुंबई: डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळल्याने या इमारती खाली ४० ते ५० लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 
मुंबईच्या डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली आहे. केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळल्याने ढिगाऱ्याखाली जवळपास 50 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
 
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. डोंगरीतील तांडेल स्ट्रीटवरील अब्दुल हमीद दर्ग्याजवळची केसरबाई ही ग्राऊंड फ्लोअर अधिक 4 मजली इमारत कोसळली. 11 वाजून 45 मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली.
 
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. किती लोक ढिगाऱ्याखाली अडकले याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

फोटो: एएनआय