testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सातारा करांनो सोशल मीडिया वरील हे पत्र खोटे हे आहेत खरे आदेश

rain
Last Modified शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (10:18 IST)
सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू असून,या ठिकाणी
पूरपरिस्थिती गंभीर असल्यामुळे माण तालुका वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली. सुट्टी जाहीर करणाऱ्यात आल्याचा उल्लेख असलेल्या जिल्हा अधिकारी श्वेता सिंघल यांच्या पत्रात मात्र अज्ञाताकडून फेरबदल केला आहे. नंतर हे पत्र
सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल केले आहे.

आठ दिवसांपासून पूरपरिस्थिती गंभीर असल्यामुळे माण तालुका वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली होती. मात्र, सुट्टी जाहीर करणाऱ्यात आल्याचा उल्लेख असलेल्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या पत्रात अज्ञाताकडून मोठं
फेरबदल केले गेले. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. या प्रकरामुळे आता पत्रात फेरबदल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई, कराड व पाटण या तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश काढले होते. तर पावसाचा जोर कमी झाल्याने कोरेगाव, फलटण, खंडाळा, माण व खटाव या तालुक्यांना सुट्टीच्या आदेशातून वगळण्यात आले होते. मात्र अज्ञाताकडून खोडसाळपणा करून मागील दोन दिवसांच्या पत्रात फेरबदल करण्यात आला. त्यात (गुरुवार दि ९) आणि बुधवार (दि ८) असे नमूद करून माण वगळता अन्य सर्व तालुक्यांना व शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात अजूनही कायम असलेली आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन विशेषत: पश्चिमेकडील अति पर्जन्यमान असलेल्या महाबळेश्वर, जावळी, पाटण, कराड आणि वाई या ५ तालुक्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालये यांना शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सुट्टी जाहीर केली आहे. इतर तालुके सातारा, खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव येथील शाळा व महाविद्यालये सुरु राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.हे पत्र व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. या प्रकरामुळे आता पत्रात फेरबदल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

#SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड

#SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड
राष्ट्रवादीचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला ...

हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठींबा

हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठींबा
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी शिव स्वराज्य पक्षाचे प्रमुख ...

मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन : नारायण राणे

मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन : नारायण राणे
निवडणूक होऊन जाऊ दे त्यानंतर मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा नारायण ...

अजित पवाराकडून ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट

अजित पवाराकडून ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप ...

न्या. शरद बोबडे यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस

न्या. शरद बोबडे यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. प्रथेनुसार गोगोई यांनी ...