गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (08:41 IST)

पुण्यात रेड अॅलर्ट

red alert in pune
पुण्यात गेल्या 10 दिवसात पडलेल्या पावसाइतका पाऊस गुरुवारी (8 ऑगस्ट) पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामान खात्यानं शहरात रेड अॅलर्ट जाहीर केला आहे.  
 
गेल्या 10 दिवसात पुण्यात जवळपास 200 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तेवढाच पाऊस गुरुवारी पडण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यंमध्येही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.