सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (18:10 IST)

Rain update : राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता

rain
राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबई उपनगरात पावसाने जोरदार  हजेरी लावली असून पावसामुळे सर्वत्र पाणी साचलं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. मुंबई पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

हवामान खात्यानं जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता आहे. 
राज्यात काही भागात पावसानं हजेरी लावली असून राज्यात काही भागात शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे. पावसामुळे शेतीची कामे रखडली आहे.    

कोकण विभागात मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागली आहे. मुंबई, ठाणे, परभणी, यवतमाळ या भागात पावसानं हजेरी लावली आहे.  राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 
 
 Edited by - Priya Dixit