1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जुलै 2023 (13:24 IST)

Rain Update : राज्यात मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली असून येत्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्यानं राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस येण्याचे सांगितले आहे. राज्यात हवामान खात्यानं अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहे. 

मुंबईत येत्या काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत मुंबई, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

मुंबईच्या हवामान खात्यानं मुंबई, नाशिक, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला आणि कोल्हापूर  जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे रायगड, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहे. नागरिकांनी गरज पडल्यास  घरातून बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोकण विभागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवार पासून सिंधुदुर्गात तर सोमवारपासून रत्नागिरीत आणि रायगड येथे मंगळवारपासून पावसाची जोरदार हजेरी लागणार असून या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मंगळवार आणि बुधवारी मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
Edited by - Priya Dixit