शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जुलै 2023 (17:20 IST)

Rain Update : या राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : सध्या सर्वत्र पावसाचा उद्रेक सुरू आहे.पावसाने अनेक राज्यात कहर केला आहे. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक राज्यात येत्या 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यान वर्तवली आहे. काही राज्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जाहीर केलं आहे.  काही ठिकाणी 2 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील चार ते पाच दिवस ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, विदर्भ, आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मध्य महाराष्ट्र, गोवा, मिझोराम, आणि त्रिपुरा या राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 
 
मध्य भारतात, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 31 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 1 आणि 2 ऑगस्टला पश्चिम मध्य प्रदेश आणि 2 ऑगस्टला विदर्भात मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये 1आणि 2 ऑगस्टला अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली  आहे. तर पूर्व मध्य प्रदेशात 1 आणि 2 ऑगस्टला आणि विदर्भात 1 ऑगस्टला पाऊस पडेल.
 
1 ऑगस्ट रोजी पश्चिम भारतात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 2ऑगस्ट रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. 1 आणि 2 ऑगस्ट रोजी दक्षिण भारतातील किनारपट्टी परिसर असलेल्या कर्नाटक आणि तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाची शक्यता आहे. तर 2 ऑगस्ट रोजी कर्नाटकातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
 
2 ऑगस्ट रोजी उत्तर पश्चिम भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तसंच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त 1 आणि 2 ऑगस्ट रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडेल. तर उत्तराखंडमध्ये 2 ऑगस्टपर्यंत पाऊस पडेल. पूर्व उत्तर प्रदेशात 15 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
 
Edited by - Priya Dixit