सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (09:11 IST)

राज ठाकरे टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना वर चिडले, दिसला रुद्रावतार

raj thackeray
राज ठाकरे यांनी महिनाभरापूर्वी खालापूर टोलनाक्यावर पाच किलो मीटर अंतर असलेली वाहतूक कोंडी मिनिटात सोडवत रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. याशिवाय त्यांनी त्याच्या शैलीत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना खडसावले होते. यानंतर आता राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा रुद्रावतार पाहायला मिळाला. नाशिक दौरा आटोपून मुंबईकडे येत असताना त्यांनी ठाणे टोलनाक्यावर अडकलेल्या शेकडो वाहनांना रस्ता करू दिला आणि त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना खडसावले.

दोन दिवसीय नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांना ठाणे टोलनाक्यावर शेकडोंच्या संख्येने गाड्या रांगेत ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या पाहायला मिळाल्या. वाहनधारकांची होत असलेली गैरसोय पाहून राज ठाकरे यांचा पारा चढला आणि त्यांनी गाडीतून उतरत टोलनाक्यावर गेले आणि अडकलेल्या लोकांना रस्ता करून दिला. यानंतर त्यांनी टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत सज्जड दम देऊन अडकलेला ट्राफीक काही क्षणात सोडवला. दरम्यान, राज ठाकरे यांनी आज नाशिक दौऱ्यातही टोलचा मुद्दा उपस्थित केला होता.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor