शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (15:43 IST)

राज ठाकरे झाले आजोबा

raj thackery
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली अमित ठाकरे बनले आई-वडील. अमित मिताली यांना पूत्ररत्न झाले आहे. यामुळे आता राज ठाकरे यांच्यावर 'आजोबा' अशी नवीन जबाबदारी असणार आहे. राज  यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी नवीन पाहुण्यांची जय्यत तयारी असून राज ठाकरेंना त्यांच्या नव्या घरात नवा आनंद पाहायला मिळत आहे . मुंबईतच राज यांच्या नातवाचा जन्म झाला आहे, कारण मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे. 
 
मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन यासंदर्भातील माहिती दिली. मिताली या मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल होत्या. नातू झाल्याची बातमी समजल्यानंतर राज ठाकरेही ब्रीच कॅण्डी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.