Festival Posters

राज ठाकरे यांना अयोध्येला जाऊ द्या, विरोध करु नका- देवेंद्र फडणवीस

बुधवार, 11 मे 2022 (13:02 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी जोरदार विरोध केला आहे. बृजभूषण यांनी त्यासाठी मंगळवारी (10 मे) मोर्चाही काढला होता. याच प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं की, राज ठाकरे यांना अयोध्येला जाऊ द्या. विरोध करण्याचं कारण नाही.
 
"राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंग का विरोध करत आहेत, हे मला माहिती नाही. माझं याविषयी त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. राज ठाकरेंना विरोध करण्याचं कारण मला समजलेलं नाही, पण माझं स्पष्ट मत आहे, रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे. त्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, मनसे नेत्यांच्या कारवाईसंदर्भात आक्रमक होऊन राज ठाकरे यांनी मंगळवारी (10 मे) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरमरीत पत्र लिहिलं.
 
या पत्राबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडून इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं. आम्ही ठाकरे सरकारविरोधात दोन हात करतोय, राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारविरोधात लढलं पाहिजे."

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

केतन अग्रवाल हत्याकांडानंतर, राष्ट्रीय पुरुष आयोगाच्या स्थापनेची मागणी तीव्र झाली

LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र

मुसळधार पावसाचा हवामान विभागाने जिल्ह्यात ४ आणि ५ जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केला

नागपूरमध्ये काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी भाजप-आरएसएसवर मंदिरातील देणग्या लुटल्याचा गंभीर आरोप केला

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे शिवसेनेच्या या दोन खासदारांना मंत्रीपदे मिळणार

पुढील लेख
Show comments