गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मार्च 2024 (08:29 IST)

नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत..

raj thackeray
उद्धव ठाकरे यांनी आणखी एक ठाकरे चोरण्याचा भाजपकडून प्रयत्न अशी टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरे नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत. असा टोला ट्विट करत लगावला आहे. या ट्विटनंतर आता शिवसेना उध्दव ठाकरे आणि मनसे हे आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
राजसाहेब दिल्लीत गेले काय आणि इकडे अनेकांना पोटाचे आजार चालू झाले…
संयम ठेवा थोडा.. राजसाहेब ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत राजकारण शिकलेले राजकारणी आहेत.. नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत..
 
मंगळवारी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. याप्रसंगी अमित ठाकरे उपस्थित होते. या भेटीत त्या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान उद्धव ठाकरे जाहीर सभेत  टीका केली. त्या टीकेला बुधवारी अविनाश जाधव यांनी ट्विट करत प्रत्युत्तर देताना, राज दिल्लीत गेले काय आणि इकडे अनेकांना पोटाचे आजार चालू झाले आहे. संयम ठेवा थोडा असेही नमूद केले आहे. याशिवाय राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत राजकारण शिकलेले राजकारणी आहेत. असे स्पष्टीकरण देताना नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत. अशी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका ट्विटद्वारे जाधव यांनी केली आहे.
Edited by Ratnadeep Ranshoor