रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोदींचा लग्नावर विश्वास आहे का? राज यांचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे जानेवारी महिन्यात विवाहबंधनात अडकणार असून या लग्नसोहळ्यात ठाकरे कुटुंब मोदींना निमंत्रण देणार का?, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या प्रश्नावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींचा लग्नावर विश्वास आहे का?, असे सांगत राज ठाकरे यांनी प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले आहे.
 
अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार असून मुंबईतील सेंट रेजिस येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याविषयी राज ठाकरेंना शनिवारी प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, अमितचं लग्न साधेपणाने करणार आहोत असे  सांगितले.