रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (15:49 IST)

असा आहे राज यांचे मिशन विदर्भ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  आता मिशन विदर्भ आयोजित केला असून १७ सप्टेंबरपासून आठवडाभर ते विदर्भात तळ ठोकून राहणार आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष आता महापालिका निवडणुकांकडे लागलं आहे. त्यामुळे मनसेनेही पुढाकार घेत निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
 
राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षानेही निवडणुकासांठी रणनीती आखली असून राज ठाकरे यांनी एन्ट्री घेतली आहे. त्यानुसार, १७ सप्टेंबरपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत.
 
असा असेल विदर्भ दौरा
 
१७ सप्टेंबरला नागपूर येथे रेल्वेने रवाना होतील.
१८ सप्टेंबर रोजी सकाळी नागपूर येथे त्यांचं आमगन होईल. त्यानंतर, १८ आणि १९ सप्टेंबर रोजी निवडणुकांसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.
२० सप्टेंबरला १ दिवसीय चंद्रपू दौऱ्यावर जातील.
२१ सप्टेंबर रोजी अमरावती दौरा करतील.
२१ आणि २२ सप्टेंबर रोजी पुन्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतील.
२३ सप्टेंबर रोजी ते मुंबई येण्यासाठी रवाना होतील.