बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (19:58 IST)

राज ठाकरे यांनी १००० रुपये दंड भरला

अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे त्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी दैनिकात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार राज ठाकरे हे शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी उद्घोषणा केली जात होती. मात्र, ही बाब बहुधा राज ठाकरे यांच्या लक्षात आली नाही. 
 
राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही पेटवली होती. हा प्रकार रो-रो बोटीवरील अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने राज ठाकरे यांना नियमाविषयी सांगितले. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपयांचा दंड भरला.