शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज ठाकरे मुख्यमंत्री आणि अमित शाह यांना भेटणार

Raj Thackeray will meet CM and Amit Shah
आपण ज्वालामुखीवर बसलेलो आहोत. त्यामुळे भारतात बेकायदारित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांना इथून हाकलून दिलचं पाहिजे. त्यासाठी मी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहोत असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
 
महाराष्ट्रात काही भाग असे आहेत. त्या भागांमध्ये अनेक बाहेरच्या देशांमधले मौलवी जातायत. काय करतायत माहित नाही. पोलिसही आत जाऊ शकत नाहीत. तिथे काय शिजतय हे कळत नाहीय. पण पोलिसांच्या माहितीनुसार प्रचंड काहीतरी मोठं घडवण्याचं कारस्थान रचलं जातयं. ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळे हात देण्याची गरजेच आहे असे राज ठाकरे म्हणाले.
 
महाराष्ट्रातले ते भाग कुठले आहेत त्याबद्दल राज ठाकरे यांनी माहिती दिलेली नाही. याबद्दल आपण लवकरच देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्याना भेटून त्याबद्दल माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले