शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नागरिकत्व सुधारणा कायद्याला मनसेचा पाठिंबा

केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी मनसे मोर्चा काढणार आहे. मोर्चाला उत्तर हे मोर्चानेच दिलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. येत्या ९ फेब्रुवारीला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेचं मुंबईमध्ये आज पहिलं अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनात राज ठाकरेंनी मनसेची पुढची भूमिका स्पष्ट केली.
 
सीएए एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम ३७० असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.