शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:36 IST)

राज यांची अतिशय बोलकी प्रतिक्रिया, पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही

raj thackeray
शिवसेना पक्षाची सूत्रे आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपविण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने  दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ शेअर करत या निर्णयाबाबत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
 
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक विचार ट्वीट केला आहे. ‘नाव आणि पैसा… पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो… पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही, ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा. नाव मोठं करा…’ असे या व्हिडीओत आहे. बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं…., असे राज ठाकरे यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor