मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शिवसेना , सोमवार, 17 डिसेंबर 2018 (16:57 IST)

२०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावे : रामदास आठवले

ramdas athavale
भाजपनं आपसातील भांडण थांबवावे. २०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावं. अन्यथा त्याचा शिवसेनेला फटका बसेल असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे. प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले कल्याण येथे आले होते. 
 
यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेला महायुतीमध्ये येण्यास सांगितले. शिवाय, शिवसेना महायुतीमध्ये न आल्यास त्याचा फटका हा शिवसेनेला बसेल असं मत देखील व्यक्त केलं. दरम्यान, कोस्टल रोडवरून शिवसेना – भाजपमध्ये नाराजी नाट्य आहे. तर, दुसरीकडे कल्याणच्या मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपुजनाला देखील शिवसेनेला बोलावण्यात आलं नव्हतं. यावर प्रश्न विचारल्यानंतर रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजपच्या मनामध्ये जलन आहे. पण, त्यांच्या  मनोमिलनासाठी आपण तयार असल्याचं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.