suvichar

पवार साहेबांनी केलेल्या मदतीचे राणेंनी स्मरण करावे -जयंत पाटील

शुक्रवार, 24 जून 2022 (21:29 IST)
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडा विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांना विधानसभेच्या प्रांगणात यावच लागेल असे वक्तव्य केले होते.तसेच मविआचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. शरद पवार हे धमक्या देत आहेत. बंडखोर आमदारांच्या केसाला धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल असे ट्विट नारायण राणे यांनी केले होते. याला आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. पवार साहेबांनी केलेल्या मदतीचे राणेंनी स्मरण करावे म्हणजे त्यांना आपले विधान मागे घ्यावे असे वाटेल असं वक्तव्य  त्यांनी माध्यमांसमोर केलं.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले, नारायण राणे यांच्या विधानावर महाराष्ट्रातील माणूस कसा पाहतो हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. पवार साहेबांना विधानसभा, लोकसभा, विधिमंडळांचा अनुभव आहे. सभागृहात विधानसभेचे सदस्य आल्यानंतर काय करतात याला जास्त महत्त्व असते हेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी काल केला. यावर नारायण राणे यांनी ज्या पध्दतीने वक्तव्य केले त्या पद्धतीने आम्हालाही बोलता येतं. पण लोकशाहीमध्ये गुंडगिरी करणे योग्य नाही. मात्र काही लोकांच्याकडून अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे राणे जे बोलतात याच्याकडे गांभीर्याने बघू नये असं मला वाटतं असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

आज राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मान्सूनचे जोरदार पुनरागमन

मेक्सिकोमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

फडणवीस दिल्लीला जातील, एकनाथ शिंदे नाही तर महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असेल संजय राऊतांचा दावा

LIVE: राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

JSW MG Motor ने लॉन्च केले अ‍ॅडॅप्ट प्लॅटफॉर्म नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि प्लग-इन हायब्रीड एसयूव्ही आर्थिक वर्ष २०२७ मध्ये दाखल होणार

पुढील लेख
Show comments