बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (08:23 IST)

रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे : बच्चू कडू

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच, त्यांना घरात घुसून फटकवायला हवं असंही कडू म्हणाले. “गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
 
“सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकऱ्यांचा अपमान आहे. रावसाहेब दानवे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे हे समजण्यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असेही बच्चू कडू म्हणाले.