मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (09:17 IST)

डॉक्टर महिलेवर बलात्कार करून मोबाईलमध्ये त्याचे अश्लिल चित्रीकरण

पुण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची धक्कादाक घटना घडली आहे. डॉक्टर महिलेवर बलात्कार करून मोबाईलमध्ये त्याचे अश्लिल चित्रीकरण करून त्याद्वारे महिलेला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन नराधमाने पीडितेला जबरदस्तीने लॉजवर नेऊन तिच्यावर शरीससंबंध व अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित डॉक्टर महिलेने तक्रार दिली असून त्यांच्या तक्रीरीवरून रवींद्र लसणे (वय-३० रा. उलवेगाव, नवी मुंबई) आणि दिपक पाटील (रा. मोरेवस्ती, चिकली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी माफी मागण्याच्या बहाण्याने लॉजवर घेऊन गेले. त्याठिकाणी गंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपींनी लैंगिक अत्याचार करतानाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. हा प्रकार मागील नऊ वर्षापासून सुरु होता. तब्बल नऊ वर्षे आरोपींनी पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, रविवारी (दि.२८) रात्री दोन्ही आरोपींनी पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा धमकावून तिच्यावर अत्याचार केले. अखेर त्यांच्या त्रसाला वैतागून पीडित महिले चिखली पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.