मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 मे 2019 (10:03 IST)

पॉर्न व्हिडीओ दाखवून नऊ वर्षीय मुलावर अत्याचार

Rape with child
मुबई येथे संतापजनक घटना घडली आहे. एका नराधमाने डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलावर पॉर्न व्हिडीओ दाखवून अत्याचार केल्याचा मोठा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील पीडित मुलाचे वय 9 वर्ष असून, नारधान आरोपीचे नाव दिनेश लावहरी आहे. यास मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
डोंबिवली येथील 9 वर्षाच्या मुलाला नराधम आरोपी आपल्या घरी घेऊन गेला होता. तेथे त्याने पीडित मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवले आणि लैंगिक अत्याचार केले. तर त्या आरोपीने पुन्हा मुलाला काही दिवसांनी घरी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने नकार दिला. याच्या राग मनात धरुन आरोपीने पीडित मुलाला जबर मारहाण केली आहे. या मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या पालकांनी तुला दिनेश काकाने का मारले होते असे विचारले. तेव्हा मुलाने आईला त्याच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर, पीडित मुलाच्या पालकांनी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंबंधी कारवाई करत मानपाडा पोलिसांनी दिनेश लावहरी याला अटक केली आहे.
 
नराधम आरोपी दिनेश त्याच्या पत्नीसोबत राहतो. हा प्रकार समोर येताच डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आपली लाहन मुले कोणासोबत आहेत किती वेळ आहेत त्यांच्या सोबत काही गैर होते आहे का हे आता पाहणे पालकांना गरजेचे होणार आहे.