1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (16:23 IST)

चंद्रपुरात दुर्मिळ पांढरे हरीण आढळले ,सोशल मीडियावर फोटो व्हायरल

social media
आपण तपकीरी रंगाचे हरीण बघितले असतील पण चंद्रपुरात पांढऱ्या रंगाचे दुर्मिळ हरीण आढळले आहेत. चंद्रपुरात पोम्भूर्णाच्या वनपरी क्षेत्रात हे दुर्मिळ हरीण आढळले आहेत. पोंभुर्णा वनपरिक्षेत्र 7 हजार एकराचे असून त्यात वाघ, बिबटे, नीलगाय, रानगवे हरीण अशे  प्राणी  आढळतात  पण पांढरे हरीण प्रथमच आढळले आहेत. बल्लारपूरचे सामाजिक  कार्यकर्ते  पवन भगत आणि बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय कळसकर हे केमारा देवई (पोंभुर्णा) गावावरून कौटुंबिक कार्यक्रम उरकून सहपरिवार परत येत असतांना त्यांना केमारा देवई (पोंभुर्णा) वनक्षेत्रात पांढऱ्या रंगाचे अतिशय दुर्मीळ 3 हरिण आढळून आले. त्यांनी लगेच हे दृश्य कमेरात कैद केले. हे फोटो  सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले. भारतात काझीरंगा येथे देखील पांढरे हरीण  आढळले होती. 7 मार्च रोजी पावन भगत हे कुटुंबासमवेत परत येत असताना त्यांना 3 पांढरे हरीण दिसण्याचा दावा  त्यांनी केला. त्यांनी दुर्मिळ पांढऱ्या हरिणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असून पांढरे हरीण चर्चेचा विषय  बनले आहेत.    
 
Edited By - Priya Dixit