शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (16:05 IST)

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज नाही, जाणून घ्या नियम

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. या माध्यमातून गरीबांना रेशन पुरवलं जातं. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागेत तसेच या नियमांत काही बदल करण्यात आले आहे.
 
आता नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर जातीच्या प्रमाणपत्राची गरज नसणार. प्राधान्य आणि अंत्योदय योजनेअंतर्गत अनुक्रमे 24 लाख 91 हजार 851 आणि 2 लाख 19 हजार 308 लाभार्थी असून त्यांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळत आहे.
 
रेशन कार्ड हे नवीन गॅस कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसेंस, बँक खाते उघडण्यासाठी तसेच सिम कार्ड मिळविण्यासाठी तसेच मतदार ओळखपत्रासाठी देखील आवश्यक असतं.
 
नवीन रेशन कार्डासाठी कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट साइझ फोटो, जुने रेशन कार्ड, नसल्यास रद्ध झाल्याचे प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याची पासबुकची कॉपी, त्याच्या नावावर असलेल्या गॅस बुकची कॉपी, संपूर्ण कुटुंबाच्या आधार कार्डची झेरॉक्स, सर्वांचा जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, वीज बिल, पॅन कार्ड आणि वोटर आयडी कार्ड इतर डॉक्युमेंट्स सादर करावी लागणार आहे.
 
दरम्यान रेशन कार्ड तयार करण्यासाठी त्यात जातीचा दाखला जोडावा लागणार अशी काही अट नाही. त्यामुळे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला द्यावा लागणार यात कुठलेही तथ्य नसल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी स्पष्ट केलं आहे.