शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (15:44 IST)

महावितरणचा प्रताप,विजेचा वापर नाही तरीही पाठवल हजारोच बिल

गेल्यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात भंडाऱ्यातील पिपरी गाव बुडालं होतं. गोसेखुर्द धरणामुळं पुनर्वसित झालेलं हे गाव. घरातले विजेचे इलेक्ट्रिक मीटर देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले. या बंद पडलेल्या घरामध्ये सध्या स्मशानशांतता आहे. घरं जमीनदोस्त झाली आहेत. 
 
मात्र महावितरण वीज कंपनी या वापरात नसलेल्या घरांची वीजबिलं दर महिन्याला न चुकता पाठवत आहे. पूरग्रस्त गावकऱ्यांनी नवीन ठिकाणी तात्पुरती घरं बांधलीत. तिथं इलेक्ट्रिक मीटर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण थकीत वीजबिलं आधी भरा, मग नवीन मीटर देऊ, असं महावितरणने गावकऱ्यांना सांगितलं आहे. विजेचा वापर न करताच, 30 हजार रुपयांची बिलं आली. ती कशी भरायची, अशी चिंता आता गावक-यांना सतावतेय..