शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2023 (22:25 IST)

रत्नागिरी ‘बिपरजॉय’चक्रीवादळ अतितीव्र रुप धारण करण्याची शक्यता

cyclone
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अतितीव्र रुप धारण करण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. समुद्राजवळून 40-50 किमी तर कमाल 55 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. जोरदार पाऊस तसेच समुद्र देखील खवळलेला राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘अलर्ट’जाहीर केला असून नागरिकांना 12 जूनपर्यंत सतर्पतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडुन मिळालेल्या पूर्व सूचनांनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले आहे. या वादळामुळे 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले अशांनी तात्काळ समुद्रकिनारी परतावे अशा स्वरुपाच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरातील मोचा चक्रीवादळ आल्यानंतर नवीन वर्षातील दुसरे आणि अरबी समुद्रातील पहिले वादळ बिपरजाय सक्रिय झाले आहे. या अनुषंगाने या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (समुद्र चौपाटी) येथे जाणे टाळावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
 
वादळ काळात जोरदार पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिह्यात पर्जन्यमान विषयक व वा-याच्या वेगाविषयक प्राप्त माहितीनुसार, 9 ते 12 जून या काळात जिह्यातील पर्जन्यमान 9 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी वादळी वारा (वाऱयाचा वेग 30-40 कि.मी. प्रती तास) व विजांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 10 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा ( वा-याचा वेग 30-40 कि.मी. प्रती तास) व बोजाच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 11 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तर 12 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
 
जिल्ह्यात वादळी घोंघावणार
बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह कर्नाटक-गोवा किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. काही ठिकाणी किमान 40 ते कमाल 60 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. आज 10 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा-महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रतितास वेगाने तर कमाल 55 किमी वारे वाहण्याची शक्यता आहे. 11 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रतितास वेगाने तर 12 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. आणि समुद्राजवळून 40-50 किमी तर कमाल 55 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी सदर कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. नागरिकांनी समुद्रात जावू, पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये, समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नये असेही सांगण्यात आले आहे.
 
जिल्हा प्रशासनाकडून संपर्क क्रमांक जारी
वादळाचा प्रभाव जिल्ह्यात जाणवणार असल्याने कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नागरिकांसाठी प्रशासनाने क्रमांक जारी केले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील तब्बल 9 तालुक्यांमध्ये तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत असून त्यांचे देखील संपर्क क्रमांक जारी करण्यात आलेले आहेत.
1. जिल्हा नियंत्रण कक्ष 02352-226248, 222233
2. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222
प्रादेशिक बंदर विभाग नियंत्रण कक्ष 02352295756
राजापूर 02352-222027
लांजा 02351295024
रत्नागिरी 02352-223127
संगमेश्वर 02354-260024
चिपळूण 0235ö295004
गुहागर 0235-240237
खेड 02356-263031
दापोली 0235ö282036
मंडणगड 02350 -225236
Edited by : Ratnadeep Ranshoor