सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 मे 2023 (21:26 IST)

वक्फ मंडळाचे जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे सुरु

District Office of Wakf Board started at Ratnagiri
मुंबई,: शासनाने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे जिल्हा स्तरावर कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय कार्यालय सुरू होत आहे.
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना मशीद, दर्गा आदी ट्रस्टची नोंदणी करण्यासाठी किंवा संबंधित कामासाठी औरंगाबाद येथील मुख्यालयी जावे लागत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचे कार्यालय सामाजिक न्याय भवन रत्नागिरी येथे सुरू करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा. ताशिलदार यांनी कळविले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor