1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Shivshahi bus driver committed suicide in the bus itself

शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

shivshahi bus
नाशिक आगारा च्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना वावी गावाजवळ घडली, सिन्नर शिर्डी मार्गावरील वावी आणि पांगरी च्या दरम्यान काल शिवशाही बस येथील शिंदे वस्तीजवळ नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी करून देण्यात आली होती, रात्री बस दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्तीपथक आले असता राजू ठुबे रा, विंचूर दळवी असे या बसचालकाचे नाव आहे, आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. 

यावेळी बस चालक राजू ठुबे याने बस मध्ये पाठीमागच्या शीट वर हँडलला करगोटेच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती वावी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पहाटे सहा वाजेच्या सुमारास सिन्नरचे आगार प्रमुख नेरकर यांच्यासह नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.