1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (07:35 IST)

रत्नागिरी :एकाच विहिरीत आढळला दोघांचा मृतदेह

death
रत्नागिरी : तालुक्यातील गावडे-आंबेरे बीर्जेवाडी येथे विहिरीत दोघा तरूणाचा मृतदेह आढळून आल़ा. रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाल़ी असून दोन्ही मृत अवस्थेत आढळून आलेले तरूण परिसरातील नागरिकांच्या परिचायाचे नसल्याचे समोर आले आह़े. त्यामुळे हे तरूण नेमके कोण, कशासाठी याठिकाणी आले होते याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आह़े.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृतदेहांपैकी एकाचे वय 45 तर दुसऱ्याचे वय अंदाजे 50 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आह़े संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या या दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदन व व्हिसेसा तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे पाठविण्यात आले आहेत़. तसेच मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पुर्णगड पोलिसांकडून पंचकोशीतील विविध गावात चौकशी करण्यात येत आह़े मात्र अद्याप हे मृतदेह कोणाचे याचा थांगपत्ता लागलेला नाह़ी.
 
रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावडे-आंबेरे बीर्जेवाडी येथे स्मशानाकडे जाणाऱया रस्त्याकडेला असलेल्या विहिमध्ये दोघा तरूणांचे मृतदेह असल्याची बाब स्थानिक रहिवाशांना दिसून आल़ी मृतदेहांना पाण्यामध्ये तरंगताना पाहताच गावकऱयांची बोबडीच वळल़ी लागोलाग या घटनेची खबर गावच्या पोलीस पाटील आदीती लाड तसेच पुर्णगड सागरी पोलीस ठाण्यात देण्यात आल़ी संशयास्पद स्थितीत मृतदेह असल्याच्या खबरेने पूर्णगड पोलिसांचे पथक वाऱयाच्या वेगाने घटनास्थळी दाखल झाल़े.
 
मृतदेहांबाबतची खबर लगतच्या गांवामध्ये पसरताच लोकांचा जमाव विहिरीच्या घटनास्थळी दाखल झाल़ा मृतदेह नेमके कुणाचे, कुणी मारून टाकले का? अशा आशयाच्या चर्चा लोकांमध्ये रंगू लागल्य़ा दरम्यान स्थानिक तरूणांना हाताशी धरून पोलिसांनी दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढल़े तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे पाठविण्यात आल़ा
Edited By - Ratnadeep Ranshoor