शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (07:14 IST)

रेल्वे प्रवाशाचा हिऱ्याचा हार चोरट्याने लांबवला

Railway passenger
रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिऱ्यांचा हार चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. अनमोल आरके तिवडेवाड (वय-31) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हार चोरी करणाऱ्या चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनमोल तिवडेवाड हे 9 मे 2023 रोजी राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेसमधून कोच नंबर बी-5 मधून प्रवास करत होते. रात्री ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली. यावेळी तक्रारदार अनमोल तिवडेवाड यांच्या झोपेचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्याकडील हिऱ्यांचा हार व 50 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान,आपल्या बॅगमधील बॅगमधील हार व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार सापडून आला नाही. या प्रकरणी अनमोल यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.रेल्वे प्रवाशाचा हिऱ्याचा हार चोरट्याने लांबवला,
रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिऱ्यांचा हार चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. अनमोल आरके तिवडेवाड (वय-31) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हार चोरी करणाऱ्या चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनमोल तिवडेवाड हे 9 मे 2023 रोजी राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेसमधून कोच नंबर बी-5 मधून प्रवास करत होते. रात्री ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली. यावेळी तक्रारदार अनमोल तिवडेवाड यांच्या झोपेचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्याकडील हिऱ्यांचा हार व 50 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान,आपल्या बॅगमधील बॅगमधील हार व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार सापडून आला नाही. या प्रकरणी अनमोल यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.