शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (12:38 IST)

Pune: काय सांगता, पुण्यात PMPML बस चोरट्यांनी पळवून नेली

या जगात कधी काय होईल हे सांगू शकत नाही. असं म्हणतात पुणे तिथे काय उणे असे काहीसे पुण्यात घडले आहे. आता पर्यंत आपण चोरट्यांनी एटीएम मशीन पळवले, दुचाकी ,चारचाकी पळवली. अशा बातम्या ऐकल्या होत्या पण चक्क PMPML बस चोरट्यांनी पळवून नेली हे प्रथमच ऐकले आहे. होय, पुण्यातील सणस मैदान परिसरातून PMPML बस चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर चोरट्यांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात पीएमपी स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली सून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीएलच्या बस चालकाने पालखी सोहळ्यामुळे बस लावण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे बस पुलगेट आगारात लावली नसून सारसबाग परिसरातील सणस मैदानात लावली होती. बस चालकांकडून चाबी बस मध्ये लागली राहिली. चावी बसला लागलेली पाहून मध्यरात्रि चोरट्याने बस पळवून नेली आणि मार्केट यार्डच्या आगारात बस लावून पसार झाला. बसची बॅटरी चोरट्याने पळवून नेली असल्याचे समजले. 

या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध तक्रार नोंदवली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे .
 
Edited by - Priya Dixit