Pune news पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा
पुण्यामध्ये वारंवार अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. शिवाय पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे आज मनसेच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेत पुणे महानगर पालिकेवर मोर्चा काढला.
मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यावेळी माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, 24x7 पाणीपुरवठा योजना फसली आहे, 43 पाण्याच्या टाक्या बांधून ठेवल्या आहेत आणि शेकडो किलोमीटर पाईपलाईन टाकून ठेवल्या आहेत तरीही पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीये. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे.
...म्हणून मोर्चा काढलापुण्यात मनसेने महानगर पालिकेवर हंडा मोर्चा काढलापुणेकरांना अशुद्ध पाणी मिळत असल्याने मनसेचा मोर्चाशुद्ध पाण्यासाठी पुण्यात मनसेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमकमोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागीपुण्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणीडोक्यावर हंडा घेऊन शेकडो महिला मोर्चामध्ये सहभागीपुणे महानगर पालिकेच्या दारासमोर प्रचंड घोषणाबाजी