रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (10:31 IST)

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील हॉटेलमध्ये भीषण आग

fire
पुण्यात रात्री उशिरा एका हॉटेलला अचानक आग लागल्याचे वृत्त आले आहे. या हॉटेलचे नाव रेवल सिद्धी असे आहे. ही आग लागली तेव्हा कर्मचारी हॉटेलमध्ये झोपले होते. आग लागल्यामुळे संपूर्ण खोली धुराने भरून गेली होती जेव्हा त्यांना जाग आली. त्याने बाहेर पडण्याचा खूप प्रयतन केला पण आगीने त्यांना घेरले असून यामध्ये तीन कर्मचारी भाजले होते, ज्यात दोघांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर तिसर्‍यावर दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
प्रत्यक्षदर्शींप्रमाणे हॉटेलमधून आगीच्या ज्वालांचे आणि धुराचे लोट उठणारे दृश्य भयावह होते. आतमध्ये अडकलेले कामगार मदतीसाठी हाक मात होते. तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातात हॉटेलमध्ये थांबलेल्या पाहुण्यांना कोणतीही हानी झाली नाही. पोलिसांनी हॉटेल सील करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.