गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 23 मे 2023 (12:20 IST)

Pune : दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाची पुष्प सजावट

महाराष्ट्राचे आराध्य देव गणपती यांचे पाताळातील शेषात्मज गणेश अवतार घेतलेला दिवस म्हणजे पाताळातील  गणेश जयंती साजरी करण्यात आली. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशाची शेषनागाच्या स्वरूपात फुलांची आरास करण्यात आली. फुलांची आरास पाहणाऱ्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत शेषनागाच्या स्वरूपाची विविध फुलांची आरास करण्यात आली.याच दिवशी गणेशाचे शेषात्मज अवताराचा जन्म झाला होता. 

या निमित्त मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. नंतर पहाटे चार वाजता गायक ऋषिकेश रानडे आणि सहकारी कलाकारांनी गणराया समोर गाण्यातून आपली सेवा दिली. गणेश याग आणि गणपतीचे सहस्त्रावर्तन करण्यात आले. गणपती मंदिरात अनेक धार्मिक विधी देखील करण्यात आले. मंदिरात पहाटे 3 वाजेच्या सुमारास ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत सूक्त अभिषेक करण्यात आले. 
 
Edited by - Priya Dixit