रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2023 (20:54 IST)

पुण्यात पडलेल्या ‘त्या’ कोरियन यंत्रावर नेमकं काय लिहिलंय?

पुण्यात खेड तालुक्यातील वाफगाव या गावामध्ये गुरूवारी सकाळी आकाशामधून अचानक एक उपकरण असल्यासारखी वस्तू जमिनीवर पडली.
 
ती पडत असताना या वस्तूला असलेला फुगा फुटल्यामुळे मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
 
नंतर एका शेतमजुराने आपल्या मालकाला फोन करून हकीकत सगितल्यावर त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले.
 
पोलिसांनी या वस्तूचा पंचनामा करून वस्तू ताब्यात घेतली. मात्र ही वास्तू काय आहे याची शहानिशा करून आम्हाला कळवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 
त्या वस्तूवर नेमकं काय लिहिलं आहे?
सापडलेल्या वस्तूवर नेमकं काय लिहिलंय याबाबात माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
बीबीसी कोरिया सेवेने या मजकुराचं भाषांतर केलं.
 
त्यावर “हे उपकरण उंचावरील तापमानाच्या निरीक्षणासाठी वापरलं जातं. हे रिसायकल करता येणार नाही आणि धोकादायकही नाही. त्यामुळे कोणाला सापडल्यास कचरा समजून फेकून द्यावं,” असं लिहिलं आहे.
 
या उपकरणाचे उपयोग काय?
उंचीवरील हवेचा आवाज मोजण्याचं हे यंत्र आहे. तापमान, आर्द्रता, दाब मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर करतात.
 
समुद्रसपाटीपासून 35 किमी अंतरावर ही मोजणी करतात.
 
उंचीवरची हवा तापमान आणि तापमानात होणारे बदल तपासण्यासाठी उपयोगी ठरते.
 
जगभरात दिवसातून दोनदा त्याची तपासणी केली जाते. सुमारे 1700 जागांवर ही तपासणी केली जाते.