शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (20:56 IST)

आता रविंद्र फाटकही एकनाथ शिंदेबरोबर, पोहोचले गुवाहटीला

Ravindra phatak
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले आमदार रविंद्र फाटकही  आता गुवाहाटीला  पोहोचले आहेत. ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीयही आता एकनाथ शिंदेबरोबर जात आहेत. शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची संख्या आता ४१ वर गेली आहे. त्याचबरोबर मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड हे पण  गुवाहाटीत आहेत. आमदार रविंद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनीही बंडखोर आमदारांना साथ दिल्याने ठाकरे कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरतला पाठवले होते. त्यानंतर फाटक आता शिंदेच्या गोटात दाखल झाले आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड यांनीही शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.