रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (14:29 IST)

एकनाथ शिंदे यांचं 42 आमदारांसह गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन

eknath shinde
गुवाहाटी इथल्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं एक व्हीडिओ ट्विट केला आहे.
 
त्यानुसार, गुवाहाटी इथल्या हॉटेलमध्ये महाराराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहे. यामध्ये शिवसेनेचे 35 तर 7 अपक्ष आमदार आहे.
 
"एकनाथ शिंदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है," अशा घोषणा हे आमदार व्हीडिओत देत असल्याचं स्पष्टपणे ऐकू येत आहे.
 
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आणखी 4 आमदार रात्रीतून गुवाहाटीला पोहोचले होते तर आज सकाळी आणखी 4 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.
 
आणखी 4 आमदार रात्रीतून गुवाहाटीला
दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे चार आमदार सकाळीच गुवाहाटीमध्ये आले आहेत. ते आज एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत.