1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (10:21 IST)

अमरावतीमध्ये पुन्हा जमावबंदीचे आदेश ,कायदा मोडल्यास कारवाई

अमरावतीमध्ये पुन्हा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे . सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. भाजपने राज्यभरात धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तांनी अमरावतीत पुन्हा जमावबंदीचे आदेश दिले आहे . या दरम्यान पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिक आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल . त्रिपुरातील घडलेल्या घटनेमुळे अमरावतीत हिंसाचार वाढला त्यासाठी अमरावतीत धारा 144 लागू करण्यात आली. भाजपने या साठी बंद पुकारला या मध्ये काही आंदोलकांनी दुकानांची तोडफोड करून दगडफेक केले. पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. शहरातील बाजारपेठ सुरूच असणार. अशी माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली आहे .
शहरात इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. आता इंटरनेट व्यवस्था पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आणि कोणत्याही वृत्तवाहिनीवर भडकाऊ भाषण देण्यास बंदी घालण्यात आली आहे