1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (15:49 IST)

अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया, अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधावा लागतो : संजय राउत

Reaction
अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधावा लागतो. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. राज्यानं देशाला सातत्यानं देण्याची दानत दाखवली आहे. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो पण राज्याकडं कोण पाहत नाही.  राष्ट्रीय कोशातून निवडणुकांसाठी निधी वाटप सुरु आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
 
केंद्र सरकारनं सिंधु  बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांचं ऐकावं, असंही संजय राऊत म्हणाले. लॉकडाऊनमुळे घरात बसलेले लोक पेट्रोलच्या दरवाढीमुळे घरात बसतील. हा देशाचा अर्थसंकल्प नसून तो एका राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.