मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (17:37 IST)

माथेफिरु रिक्षाचालकाने घरात घुसून 2 महिलांना जिवंत जाळले

घरात घुसून महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मखमलाबाद रोडवर घडली आहे. या घटनेत सदर महिला गंभीर भाजली असून, अन्य एक महिला देखील जखमी झाली आहे. 
 
मखमलाबाद रोडवरील शिंदे नगरमध्ये भाविक इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये शिरून माथेफिरु रिक्षाचालकाने थेट पेट्रोल ओतून घराला आग लावली. या घटनेत दोन महिला गंभीररित्या भाजल्या गेल्या तर एक वृद्ध आणि दोन लहान मुलं सुदैवाने बचावली आहेत. 
 
घरातील आग इतकी भयानक होती की संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत. रिक्षाचालकानेचं अचानक घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण करत अचानक घर पेटवून दिले.
 
पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील शिंदे नगर येथील भाविक बिलाजियो या इमारतीमध्ये प्रदीप ओम प्रकाश गौड हे आपल्या कुटुंबासह राहतात ज्यात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजयी, मुले आणि पुतण्याचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी त्यांची नातलग असणारी पीडित महिला आली असताना दुपारी 12 वाजेच्या सुमारास या महिलेच्या परिचयातील रिक्षाचालक कुमावत हा आपल्या हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरात घुसला. रिक्षाचालकाने पीडितेस मारहाण करण्यास सुरुवात केली आणि सोबत आणलेल्या बाटल्यांमधील पेट्रोल तिच्या अंगावर फेकत पेटवून दिलं आणि तेथून पळून गेला. यावेळी घरात प्रदीप गौड यांची आई सुशीला गौड (वय 64), आजोबा जानकीदास गौड (वय 85), पार्थ गौड ( वय 15) चिराग (वय 3) हे होते.
 
घरात झालेल्या या प्रकरणानंतर आग पाहून मुलगा पार्थ याने बेडरूमचा दरवाजा लावून आपल्या आई- वडिलांना फोन लावून घटनेची माहिती दिली. या घटनेत पीडिता गंभीररीत्या भाजली असून अन्य एक महिला देखील जखमी झाल्या आहेत.
 
इमारतीच्या फ्लॅटला आग लागलेली पाहून इतरांनी अग्निशमक दलास घटनेची माहिती दिली. संशयित रिक्षा चालकास दिंडोरी येथे अटक करण्यात आली. माहितीप्रमाणे घटनेच्या आधी कुमावतने पीडित महिलेस फोन करून खाली बोलावले होते मात्र ती खाली आली नाही म्हणून कुमावतने घरात घुसून तिच्या अंगावर पेट्रोल ओतत पेटवून दिले.