शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (15:54 IST)

सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून रिक्षा चालकाला मारहाण

औरंगाबाद मध्ये एका सहाय्यक पोलिसनिरीक्षकाने कारला धक्का लागल्याच्या कारणावरून एका रिक्षा चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मयेकर यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केली.तसेच दमदाटी करून रिक्षा चालकाच्या रिक्षाची चावी देखील हिसकावून घेतली.
 
प्रकरण असे आहे कीसहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मयेकर यांच्या कारला रिक्षा चालकाच्या रिक्षेचा धक्का लागला.या गोष्टीवरून सदर रिक्षा चालकास त्याच्या रिक्षेची चावी हिसकवून शिवीगाळ देत दमदाटी करत मारहाण केली.तो रिक्षा चालक हात जोडून विनंती देखील करीत होता तरी ही मयेकरांनी त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.पोलीस तर रक्षक असतात परंतु सहाय्यक पोलिसांच्या अशा वर्तनामुळे आणि त्यांनी केलेल्या दादागिरीमुळे औरंगाबाद पोलिसांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न उभे राहत आहे.