गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (12:09 IST)

गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी

Riots at Gautami's event
सध्या गौतमी पाटीलचा कार्यक्रमात राडा सुरुच असतो. राज्यात कुठेही कार्यक्रम असो हुल्लडबाजी सुरु असते. अलीकडेच वेळापूर येथे अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीनं विराट पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. येथे हजारोंच्या संख्येने चाहते जमा झाले होते आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच गाण्याला प्रेक्षकांकडून हुल्लडबाजी सुरू झाली. 
 
दरम्यान पोलिसांनी प्रेक्षकांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र हुल्लडबाज राडा घालत होते म्हणून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. दरम्यान कार्यक्रम  मध्येच थांबवून पोलिसांनी प्रेक्षकांना शांतता बाळगावी असे आवाहन केले तरी हुल्लडबाजी सुरूच राहिल्यामुळे पोलिसांना अॅक्शन घ्यावी लागली. मात्र गोंधळ सुरूच राहिला. नंतर ड्रोन कॅमेरातून शूटिंग करण्यात येत असल्याचे सांगितल्यावर गोंधळ कमी झाला.