सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (07:49 IST)

१३ वर्षीय मुलाने १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

suicide
ठाणे :केस बारीक कापले म्हणून रागावलेल्या १३ वर्षीय मुलाने १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन परिसरात सोनम इंद्रप्रस्थ इमारतीच्या १६ व्या मजल्यावर पाठक कुटुंब राहते. कुटुंबातील ८ वीत शिकणारा शत्रुघ्न राजीव पाठक ह्या १३ वर्षांच्या मुलास त्याच्या सख्ख्या चुलत भावाने केस कापण्यास नेले होते. परंतु केस बारीक कापल्याने तो रागावला होता.
 
घरातल्यानी त्याची समजूतही काढली. मात्र ती अपयशी ठरली. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शत्रुघ्न ने बाथरूम मधील छोट्याश्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे करत आहेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor