गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (09:31 IST)

RIP आलुरे गुरुजी:तुळजापूरचे माजी आमदार आणि शिक्षणकर्मी आलुरे गुरुजी यांचं निधन

तुळजापूरचे माजी आमदार आणि शिक्षणकर्मी सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचं निधन झाले.ते 90 वर्षाचे होते.ते बऱ्याच काळ पासून आजारी होते.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
 
त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांचा जन्म 6 सप्टेंबर 1932 रोजी झाला.त्यांनी बीड येथे शिक्षक होते.नंतर त्यांची मुख्याध्यापक पदावर नेमणूक झाली..त्यांनी शिक्षक प्रसारक मंडळा तर्फे त्यांच्या भागात नव्या शाळा सुरु केल्या होत्या.त्यांना मराठवाड्याचे साने गुरुजी म्हणून ओळखायचे.